१००० अनाथ मुलाना दत्तक घेण्याचा सकल्प झालेला असुन त्यात आज पर्यंत १५० मुला-मुलीना दत्तक घेवुन त्याचे आरोग्य तपासणी व
औषधोपचार १ वर्षाकरीता मोफत करण्याचा संकप्ल या कार्यक्रमात करण्यात आला. तसेच त्यांना हेल्थ कार्डचे वाटप श्री निवास आरोग्यवत
फाऊंडेशनने स्व. अटलबिहारी वाजपेयी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल येथे करण्यात आले.
छ.संभाजीनगर मध्ये युवक-युवतिंना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एक प्रयत्न.
सेवा पंधरवाड्यामध्ये आरोग्य शिबीरे, स्त्रियांचा मान-सन्मान, शैक्षणिक दत्तक, ग्रामसफाई, धार्मिक मंदिरे स्वच्छता, कन्यादान, बालसंस्कार, संस्कृती जोपासणुक इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पिडीत, अबला व अत्याचार ग्रस्त महिलांसाठी शासनाने सुरु केलेले वन स्टॉप सेंटरला दर महिन्याला भेट देवुन त्या पिडीत महिलेंना मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचा वसा फाऊंडेशनच्या संचालिका सायकोलॉजिस्ट डॉ. सुजाता ठाकरे (देशमुख) यांनी घेतला आहे. तसेच त्या महिलांना आपल्या हॉस्पिटल मध्ये (स्व. अटलबिहारी वाजपेयी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल) मध्ये मोफत उपचार देण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. त्यांच्या या कार्यतुन त्यांना सामाजिक बांधिलकीचा जाणीव असल्याचे दिसुन येते.
श्री निवास आरोग्यवत फाऊंडेशन संचलिक स्व. अटलबिहारी वाजपेयी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व थोर संत, महात्मा, महापुरुष व नेते यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करुन समाजामध्ये त्यांचे महान कार्य पोहोचवण्याचे कार्य व त्याचे औचित्य साधुन आरोग्य शिबीरे घेतली जातात.
शहरालगतच असलेल्या अनाथ आश्रम येथील दोन मुलींच्या कन्यादान करण्याचे श्री निवास आरोग्यवत फाऊंडेशन च्या संचालिका सौ.सुजाता देशमुख (ठाकरे) व श्री. मिलींद देशमुख यांनी ही सर्वस्वी जबाबदारी घेवुन एक सामाजीक बांधीलकी जोपासली.
पत्ता: Address : पत्ता - डी-7/11, मुकुंद हौसिंग सोसायटी.ए.पी.आय. कॉर्नर भवानी पेट्रोल पम्प जवळ, एन-2 सिडको, औरंगाबाद -431001