आमच्या श्रीनिवास आरोग्यवत फाउंडेशनच्या वतीने आरोग्य क्षेत्रामध्ये सर्वांच्या आशीर्वादाने व प्रतिसादाने रुग्णसेवेतील दुसरे पाऊल नुकतेच टाकले आहे. यामध्ये समर्थ सेवा केअर सेंटर ची उभारणी केलेली असून सुसज्ज असे बेड रिडन पेशंट करिता केअर सेंटर उभारले आहे. यामध्ये सध्या सात गरजू रुग्ण प्रवेशित असून त्यांना दोन वेळचे भोजन नाश्ता चहा औषध उपचार व नर्सिंग केअर या सुविधा प्रदान करण्यात येत आहेत सेवाभावी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या या नर्सिंग केरला दानदात्यांच्या मदतीची अपेक्षा आहे.
वयोवृद्धांकरीता मोफत आरोग्य तपासणी शिबीर
व औषधी वाटप
ग्रामिण भागातील तसेच शहरी भागातील वयोवृद्धांना या शिबीराचा मोठ्या प्रमणावर लाभ झाला. यामध्ये वृद्धांची मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांना मोफत औषधी प्रदाण केली जातात. श्री निवास आरोग्यवत फाऊंडेशन संचलित स्व. अटलबिहारी वाजपेयी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या टिम व्दारे प्रत्येक महिण्यामध्ये अशा प्रकारचे शिबीरे घेतली जातात.
सेवा पंधरवाड्यामध्ये आरोग्य शिबीरे, स्त्रियांचा मान-सन्मान, शैक्षणिक दत्तक, ग्रामसफाई, धार्मिक मंदिरे स्वच्छ बालसंस्कार, संस्कृती जोपासणुक इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कोरोना एकल विधवा महिलांना आटा चक्की व शिलाई मशीनचे वितरण
Date :
29 Oct 2022
*कोविड – 19 मुळे कर्त्या व्यक्तिचे निधन झालेल्या कुटूंबातील एकल विधवा निराधार, असाह्य महिला, अनाथ बालके, पितृछत्र गमावलेले यांच्यासाठी संस्थेच्या वतीने भरीव व विशेष उल्लेखनिय कामगिरी केली गेली.
सन मार्च 2020 ते डिसेंबर 2022 या कालावधीत महिलांना मोफत शेळीवाटप शिलाई मशिन, आटा चक्की इ. वितरण करुन त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. तसेच ग्रामिण व शहरी भागात कौशल्य विकास प्रशिक्षण देवुन त्यांना आत्मनिर्भर बणविने, त्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करुन, आरोग्य विशयक सुविधा मोफत प्रदाण करुन देण्यात आल्या त्याबरोबर अनाथ, पितृछत्र गमावलेले मुलांना शैक्षणीक साहित्य वितरीत करुण त्यांना शिष्यवृत्ती प्रदाण करण्यात आली व अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले.
atul_save वाढदिवसानिमित्त अनाथ मुले व निराधार ज्येष्ठ नागरिकांना मिळाला आधार..
Date :
16 Feb 2023
मा.श्री. अतुलजी मोरेश्वर सावे
सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य
यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन
संकल्प अनाथ मुलांना व निराधार वृद्धांना दत्तक घेण्याचा
१००० अनाथ मुलाना दत्तक घेण्याचा सकल्प झालेला असुन त्यात आज पर्यंत १५० मुला-मुलीना दत्तक घेवुन त्याचे आरोग्य तपासणी व औषधोपचार १ वर्षाकरीता मोफत करण्याचा संकप्ल या कार्यक्रमात करण्यात आला. तसेच त्यांना हेल्थ कार्डचे वाटप श्री निवास आरोग्यवत फाऊंडेशनने स्व.अटलबिहारी वाजपेयी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल येथे करण्यात आले.
औचीत्य साधुन महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले गेले. त्यात गरजु महिलांसाठी त्यांच्या तपासणी करुन त्यांचे निवारण करण्यात आले. श्री निवास आरोग्यवत फाऊंडेशनने स्व. अटलबिहारी वाजपेयी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल येथे हे शिबीर आयोजि करण्यात आले होते.