आपल्या आप्त जनांचे प्रिय जनांचे उर्वरित आयुष्याचे दिवस वेदना विरहित आणि समाधानाचे जावोत अशीच सगळ्यांची इच्छा असते . अनेकदा विविध प्रकारच्या मर्यादांमुळे इच्छा असूनही अपेक्षित सेवा करणे शक्य होत नाही आणि त्याचा सल कायमस्वरूपी मनात राहून जातो . साहजिकच मनात असा विचार येतो कि अशी व्यवस्था उभी राहिली तर किती बरे होईल आपया आप्त स्वकीयांची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि प्रशिक्षित मंडळींच्या सहाय्याने सेवा आणि सुश्रुषा होईल व त्यांचे उर्वरित दिवस व्यवस्थित जातील .
हीच गरजलक्षात घेऊन आम्ही श्रीनिवास आरोग्यवत फौंडेशन च्या वतीनेस आरोग्य क्षेत्रात दुसरे सेवावृत्ती ने पावूल टाकले आहे.
या करिता आम्ही समर्थ सेवा केयर सेंटर ची उभारणी केली आहे.या माध्यमातून आम्ही गरजू आणि रुग्ण शय्येवर असणाऱ्या व्यक्तींसाठी सर्व सुविधांनी युक्त असे सेवा केंद्र सुरु केले आहे.
यासाठी एक इमारत व अश्या रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत.या साठी आवश्यक तो प्रशिक्षित कर्मचारी वर्ग इथे उपलब्ध असेल , प्राथमिक चिकित्सेसाठी चोवीस तास वैद्यकीय साहाय्य उपलब्ध असेल , आवश्यकता वाटल्यास आप्तजनांच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था असेल मात्र याचा निर्णय व पुढील व्यवस्था आप्तांनी करणे आवश्यक असेल. रुग्णाची स्वच्छता ,आहार ,व्यायाम , औषधे देणे , शक्य असल्यास फिरवणे , मनोरंजन अश्या विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतील मात्र हे रुग्ण सेवा केंद्र आहे.
हा जगन्नाथाचा रथ आहे आणि यासाठी समाजाच्या दातृत्व शक्तीची जोड मिळणे आवश्यक आहे.
आपण हे करू शकता
हे सगळे कार्य हे आपल्या सारख्या सुजाण आणि समाजाप्रती जबाबदारी मानणाऱ्या समाज घटकांच्या मदतीनेच पुढे जाणार आहे . आपणास विनंती आहे की या अत्यावश्यक समाजकार्याला आपण मुक्तहस्ते मदत करावी.
पत्ता: Address : पत्ता - डी-7/11, मुकुंद हौसिंग सोसायटी.ए.पी.आय. कॉर्नर भवानी पेट्रोल पम्प जवळ, एन-2 सिडको, औरंगाबाद -431001