शाहु फुले, आंबेडकर फाऊंडेशन व श्रीनिवास आरोग्यवत फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. सुजाता ठाकरे तसेच डॉ. भुषण मगर यांना दुर्धर आजारांवर संशोधन करुन थॅलेसीमीया तसेच सिकलेसेल्स ॲनमीया या आजांवर भविष्यात मोठ्या प्रमाणात काम करावयाचे आहे. तसेच वृद्धांकरीता नर्सिंग केअर सुरु करायचे आहे. तसेच एकल, विधवा, परित्त्य, घटस्पोटित, गरजु महिलांना उद्योग प्रशिक्षणचे ट्रेनिंग तसेच अंध, अपंग व्यक्तिंना मोफत ऑपरेशन तसेच एड्सग्रस्तांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचन्या मोफत करण्याचा मानस आहे. तसेच गरीबांसाठी वैद्यकिय शिक्षण मिळावे म्हणुन नर्सिंग कॉलेज MBBS कॉलेज नाममात्र शुल्क दरामध्ये गरीबांना त्याचा जास्तित जास्त कसा फायदा होईल हा दृष्टीकोन आहे.
त्याचबरोबर आजची जी युवा पिढी आहे. जे की आपल्या देशाचे (भविष्य) आधारस्तंभ आहे. ती पिढी भरटुन च्या आहारी गेलेली आहे. त्यापासुन त्यांना पराववृत्त करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या माध्यमातुन जसे की कलापथक, पथनाट्याद्वारे व वेगवेगळ्या ग्रामिण तसेच शहरी भागातील महाविद्यालयांमध्ये जावुन तेथे मार्गदर्शन व समुपदेशन करुन त्यांना त्यांच्या शेतकऱ्यांच्या कुटूंबासाठी कोणतेही तात्काळ लागणारी वैद्यकिय सुविधा अत्यल्प किंवा वेळप्रसंगी मोफत पुरवीले जाते. आदिवासी भागातील महिलांसाठभ विशेष मोहिमेद्वारा या महिलांच्या भागात जावुन दर महिण्याला आरोग्य तपासणी करुन त्यांत आढळणाऱ्या समस्या जसे कि रक्ताची कमतरता असणाऱ्या म्हणजे अॅनामिक महिलांसाठी प्रामुख्याने फाऊंडेशन काम करते.
ॲलेसेमीया कुपोषण, ॲनोमीक ह्या प्रकारच्या दुर्गम भागात आढळतात त्यावर श्रीनिवास फाऊंडेशन व श्रीसाईनयन तसेच शाहु, फुले, आंबेडकर फाऊंडेशन त्यांच्या वेगवेगळ्या टिम मार्फत जावुन गरीबी, अंधश्रद्धा, अज्ञान तसेच डॉक्टरांची कमतरता या सर्व गोष्टींची उणीव स्व. अटलबिहारी वाजपेयी हॉस्पिटल त्या भागात त्यांच्या टिम मार्फत जावुन भरुन काढुन तिथे कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय सर्वोतोपरी प्रयास करते. तसेच मुकबधीर, अंध अपंग, मतीमंद व अनाथ मुलांच्या तसेच वृद्धाश्रमात सुद्धा जावुन मोफत तपासणी दर महिण्याला करुन तेथील बालकांना औषधीउपचार मोफत केला जातो.
पत्ता: Address : पत्ता - डी-7/11, मुकुंद हौसिंग सोसायटी.ए.पी.आय. कॉर्नर भवानी पेट्रोल पम्प जवळ, एन-2 सिडको, औरंगाबाद -431001