डॉ.सुजाता किशोर ठाकरे यांचे 3 सेवाभावी संस्था आणि १ श्रीनिवास आरोग्यवत फाऊंडेशन म्हणुन विशेषकरुन आरोग्य क्षेत्रात काम करणारे हे श्रीनिवास फाऊंडेशन आहे. या फाऊंडेशनने औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या परिवारातील एकुण ३५०० कुटूंबांना दत्तक घेतले आहे. श्रीनिवास आरोग्यवत फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा डॉ. सुजाता किशोर ठाकरे ह्यांनी मदर तेरेजा, बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ, निसपृही नेता स्व.अटलबिहारी वाजपेयी यांसारख्या स्वत: जिवाची पर्वा न करता अवितरत दुसऱ्यांसाठी सेवा करणाऱ्या विचाराने प्रभावित वैद्याकिय क्षेत्रात पहिले पाऊल म्हणुन ना नफा ना तोटा या उद्देशाने श्रीनिवास आरोग्यवत फाऊंडेशन द्वारा संचलीत स्व. अटलबिहारी वाजपेयी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल गेल्या दोन वर्षापासुन औरंगाबाद शहरामध्ये फक्त सेवाभावी तव्तावर आरोगक्षेत्रात काम करते.
अनेक प्रकारचे मोफत आरोग्य शिबीरे या फाऊंडेशनने घेतले आहेत. या हॉस्पिटलला M.D. मेडीसीन फी फक्त ३० रुपये एवढी असेन जिथे मोफत शिबीरे घेतली जातात तिथे रुग्णालयाच्या वतीने एक “हेल्थ कार्ड” मोफत दिल्या जाते. या कार्डवर एक परिवालातील चार सदस्यांना वर्षभरासाठी फक्त तपासणी फि ३० रुपये एवढी आकारली जाते. तसेच रुग्णालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांकरीता ७५ % सवलत दिल्या जाते. तसेच कोवीडमध्ये मृत पावलेल्या परिवाराला आपण दत्तक घेवुन त्यांना मोफत तपासणी करुन औषधी व पेशंटला जेवण सुद्धा हॉस्पिटलच्या वतीने मोफत दिले जाते.
यापुर्वी हे सर्व सुविधा एस.पी. एफ. व्दारा संचलित अटलबिहारी वाजपेशी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यावर देण्यात येत होते. तसेच एस.पी.एफ. चा आणखी सेवाभावी उपक्रम म्हणजे एकल महिलांसाठी ज्या परिवारातील सदस्य कोरोनाने मृत झालेले आहे त्यांच्या रोजगारा प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक बांधीलकीची जान म्हणुन अशा एकल महिलांना स्वंयरोजगाराचे प्रशिक्षण देवुन त्यांना मोफत शेळ्या वाटप करण्यात आल्या. त्याचबरोबर मोफत आटा चक्की सुद्धा देवुन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावला त्याचबरोबर अशा परिवारातील मुलींना उच्चशिक्षनासाठी त्यांची कॉलेजची फिस भरुन त्यांना सक्षम बनविण्यासठी मदत केली. तसेच अशा परिवारातील मुला-मुलींच्या विवाहासाठी सुद्धा एस.पी.एफ. संस्थेने तसेच श्रीनिवास आरोग्यवत फाऊंडेशनने पुढाकार घेतला त्याचबरोबरया दोन्ही फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. सुजाता किशोर ठाकरे ह्यांनी पाचोरा येथे विघ्नहर्ता म्हनुण दुसरी शाखा स्थापन केली आहे. तिथे रि हॉस्पिटलच्या हेल्थ कार्डवर डायलेसीस मोफत तसेच एन्जीओग्रीफी व एन्जीओप्लास्टी फ्री केल्या जाते. बऱ्याच ऑपरेशन आतापर्यंत मोफत केल्या आहेत. त्यामध्ये उल्हास पाटील फाऊंडेशन तसेच डॉ.भुषन मगर पाटील फाऊंडेशनने सुध्दा मदत केलेली आहे.
फाऊंडेशनने वृद्धांसाठी Bedridden Patient हो अत्यंत चांगली योजना सुरु केलेली आहे. ही योजना ” अटल आरोग्य अभियाना अंतर्गत चालु केली आहे. ह्यामध्ये घरी ज्या गरिब वृद्धाची पैशाअभावी मेडिकल सुविधा पुर्ण होवु शकत नाही तसेच ज्या पेशंटला पॅरॅलेसीस किंवा इतर दुर्धर आजार आहेत पैशाअभावी हे ती ट्रिटमेंट घेवु शकत नाहीत अशांसाठी हॉस्पिटलमध्ये अगदी नाममात्र शुल्कामध्ये नर्सिंग केअर घेतली जावुन त्रूंना भरती करुन जेवन सुद्धा मोफत दिल्या जाते.
त्याचबरोबर हॉस्पिटल त्यवरील रस्त्यावरील भिकारी व्यक्तिंना सुद्धा मोफत ट्रिटमेंट देते. तसेच दर आठवड्याला मोफत आरोग्य शिबीर घेतले जाते. तसेच महापुरुषांच्या जयंतीचे निमीत्ताने सुद्धा मोफत आरोग्य शिबीर घेवुन व मोफत औषधी वाटप करण्यात येते.
तसेच महिलांसाठी फाऊंडेशनने महिला सुरक्षीत घर सुरक्षीत या महानगरपालीकेच्या मोहिमेमध्ये भाग घेवुन त्यांना हॉस्पिटलचे स्त्रिरोग तज्ञ डॉक्टरांची फिस विनाशुल्क देवुन या अभियानाला हातभार लावला व याच प्रेरणेतुन पुढे डॉ. सुजाता ठाकरे मॅडमीनी “माता सुरक्षीत घर सुरक्षीत अण घर सुरक्षीत तर समाज सुरक्षीत ” या मोहिमेअंतर्गत सशक्तनारी घडवेल सशक्त समाज” ही योजना राबवुन यामध्ये स्व. अटलबिहारी वाजपेयी मल्टीस्पेशालीटी या हॉस्पिटलमध्ये गरीब व गरजू महिलांसाठी अगदी नाममात्र दरात नॉर्मल डिलेवरी तसेच सिजरीयन मध्ये केल्या जाते. त्यामध्ये फाऊंडेशनने दत्तक घेललेल्या कुटूंबांच्या ऑपरेशन व डिलेवरी अगदी मोफत करण्यात येतील.
पत्ता: Address : पत्ता - डी-7/11, मुकुंद हौसिंग सोसायटी.ए.पी.आय. कॉर्नर भवानी पेट्रोल पम्प जवळ, एन-2 सिडको, औरंगाबाद -431001