कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते कि आपला असलेला माणूस देखील जराजर्जर अवस्थेत आपल्याला पाहवत नाही आणि त्याला मदत देखील करता येत नाही, कारणे अनेक असतात ती योग्यही असतात पण त्याने परिस्थितीत फार फरक पडत नाही.
आपल्या आप्त जनांचे प्रिय जनांचे उर्वरित आयुष्याचे दिवस वेदना विरहित आणि समाधानाचे जावोत अशीच सगळ्यांची इच्छा असते. अनेकदा विविध प्रकारच्या मर्यादांमुळे इच्छा असूनही अपेक्षित सेवा करणे शक्य होत नाही आणि त्याचा सल कायमस्वरूपी मनात राहून जातो. साहजिकच मनात असा विचार येतो कि अशी व्यवस्था उभी राहिली तर किती बरे होईल आपया आप्त स्वकीयांची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि प्रशिक्षित मंडळीच्या सहाय्याने सेवा आणि सुश्रुषा होईल व त्यांचे उर्वरित दिवस व्यवस्थित जातील.
आणखी वाचाApril
25 Feb 2023
16 Feb 2023
शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. “आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे”, अशी आरोग्याची व्याख्या आहे.
याच आरोग्य क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे आरोग्यसेवा तळागाळातील जनमानसापर्यंत पोहोचून त्यांचे जीवन आरोग्यदायी व्हावे या दृष्टीने तळागाळात काम करण्यासाठी आम्ही श्रीनिवास आरोग्यवत फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. समाजात आजही असे अनेक वंचित घटक आहेत. की महागड्या औषधोपचार अभावी रोगमुक्त जीवन जगू शकत नाहीत. अशा लोकांपर्यंत या योग्य उपचार पोहोचवण्याचे ध्येय उराशी बाळगून आमची संस्था या क्षेत्रात कार्यरत आहे. छत्रपती संभाजी नगर सारख्या मोठ्या शहरांमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या गोरगरीब रुग्ण यांना आरोग्य सुविधा मिळाव्या याकरिता आम्ही सुरुवातीला अटल बिहारी वाजपेयी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या रुग्णालयाची सेवाभावी तत्त्वावर निर्मिती केली. हा उपक्रम सुरू केल्यानंतर अंथरुणावर खेळलेल्या रुग्ण ग्रामीण भागातील आजार ग्रस्त वृद्ध नागरिक यांच्याकरिता समर्थ केअर सेंटर म्हणून सेवाभावी तत्त्वावर उपक्रम सुरू केला. या दोन्ही उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भविष्यात दानदात्यांचे सहकार्य मिळाल्यास हा उपक्रम अधिकाधिक व्यापक पद्धतीने वाढवण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे.
त्याचबरोबर समाजातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून या विषयावर संशोधन करून अशा महिलांना उपचार देण्यासाठी प्रकल्प हाती घेण्याचा सुद्धा संस्थेचा मानस आहे.